शेवयांचा शिरा (Sweet Sevai Shira)

साहित्य

४ वाटया शेवया , ३ वाटया दूध ,१ वाटी पिठीसाखर ,तूप 

कृती

तुपावर ४ वाटया शेवया भाजून घेणे . microwave मध्ये चांगले भाजता येते .

दुधात पिठीसाखर विरघळवून गरम करणे ,त्यात शेवया घालणे.

वरून आवडीप्रमाणे वेलदोडा पूड, काजू ,बदाम काप घालणे .

रव्याचे लाडू (Rawa ladu )

साहित्य –

३ वाट्या रवा , पाउण ते एक वाटी तूप ,अडीच वाटया साखर 

कृती –

तूप गरम करून घेऊन त्यावर रवा भाजावा . वास येईपर्यंतच भाजावा .

(नारळ घालायचा असल्यास रवा भाजुन होत आल्यावर अर्धा वाटी नारळ घालून भाजणे )

अडीच वाटया साखर व १ ते दीड वाटी पाणी घालून चिकटसर  मधासारखा पाक करावा (पक्का नाही)

खाली उतरवून २ मिनिटे थांबून रवा घालावा , हे मिश्रण अधून मधून हलवत रहावे .

त्यात वेलदोडा पूड व आवडत असल्यास काजू ,बदाम काप घालावे .

मग लाडू वळावेत.

बेसन लाडू ( Besan Ladu)

साहित्य  –   १ वाटी  तूप , २ वाटया  बेसन ( चणा डाळीचे पीठ ) , पाव वाटी रवा ,

                 दीड वाटी पिठीसाखर , जायफळ व वेलदोडा पूड  , पाव वाटी दुध 

कृती      –    प्रथम तूप गरम करून , नंतर त्यात बेसन  भाजावे .

                  अर्धवट भाजून झाल्यावर त्यात मुठभर रवा घालावा .

                  खमंग ,तांबूस झाल्यावर भाजणे थांबवावे .

                   थोडे दुध शिंपडून जोरात हलवावे (वाफ होऊन गेली पाहिजे )

                   गार झाल्यावर  पिठीसाखर ,जायफळ व वेलदोडा पूड घालून नीट मिसळावे व लाडू वळावे .

पुरणपोळी (Puranpoli)

साहित्य

घट्ट शिजवलेले पुरण , मैदा,कणिक,तेल,मीठ 

कृती      –

घट्ट शिजवलेले पुरण पुरणयंत्रातून (किंवा मिक्सरमधून)  घोटून घ्यावे. (पुरणाची कृती पहावी.)

अर्ध मैदा अर्धी कणिक किंवा पूर्ण मैदा घेऊन सैलसर भिजवून ठेवणे.

नंतर तेल व कणभर मीठ फेसून त्यात कणिक मळावी (तार येईल इतकी)

पुरणापेक्षा कमी कणिक घेऊन पोळी हलकेच लाटावी ,वर कागद ठेवून पोळपाट उलटा करून ,

कागदावर पोळी काढून  घ्यावी व अलगद तव्यावर टाकावी.

दुधी हलवा (Dudhi Halwa ) / गाजर हलवा (Gajar Halwa )

साहित्य –  

१ किलो दुधी ,२ कप दुध ,६ चमचे मिल्क पावडर ,दीड वाटी  साखर ,

३ चमचे साजूक तूप, वेलदोड्याची पूड , काजू,बदाम काप .

कृती

१ किलो दुधी साले काढून , किसून घ्यावा  .

२ कप दुध घालून कढई  किंवा microwave मध्ये शिजवावा .

शिजत आल्यावर ६ चमचे (टी  स्पून ) मिल्क पावडर व दीड  वाटी साखर घालून पुन्हा आटवत ठेवावे .

अगदी शेवटी ३ चमचे साजूक तूप ,वेलदोड्याची पूड व काजू बदाम काप घालावे.

तूप दुधी शिजवतानाहि घालू शकतो.

याप्रमाणेच गाजरहलवाहि करता येईल.