गोळे भात – (Rice – Gole Bhat)

साहित्य  –

तूरडाळ , हरभरा डाळ , डाळीचे पीठ , धनेपूड , जिरेपूड , तिखट , मीठ  , कोथिंबीर, तेल

तांदूळ , लसूण , लाल मिरची

कृति 

१ वाटी तुरडाळ , १ वाटी हरभरा डाळ किंचित भाजून घेणे नंतर मिक्सर मधून जाडसर (भरड ) दळून घ्यावे.

२ चमचे धनेपूड ,१ चमचा जिरेपूड,२ चमचे लाल तिखट , २ चमचे मीठ , १/२ वाटी डाळीचे पीठ , कोथिंबीर ,

२ पळ्या   तेल हे सर्व घालून सैलसर भिजवावे. अर्धा पाउण  तास मुरवावे .फोडणीवर २ वाट्या पाणी घालावे.

वरील मिश्रणाचे गोळे चालू उकळीत घालावे, अलगद ढवळीत राहावे . पाणी आटल्यावर  बंद करावे.

डाळीचे पीठ न घेतल्यास १/२ किंवा १ वाटी हरभरा डाळ जास्त घ्यावी.

गोळे पाण्यात न शिजवता microwave मध्येही शिजवता येतील .

साधा भात  कुकरमध्ये  शिजवून घ्यावा.

फोडणी करून त्यात लसणीचे तुकडे ,लाल मिरची घालावी.

साध्या भातावर गोळे कुस्करून घालावेत व त्यावर फोडणी घालून घ्यावी.

Leave a comment