छोले ( Chole )

साहित्य  –

२०० gram  काबुली चणे /छोले  ,  २ कांदे, टोमाटो , आलं ,लसूण  ७,८ पाकळ्या ,

१,२ मिरच्या ,चिंच चमचाभर , तेल किंवा  तूप, छोले मसाला किंवा गरम मसाला,

तिखट ,मीठ ,हिंग,तमालपत्र ,धनेजिरे पूड

कृति

२०० gram काबुली चणे(छोले) रात्रभर पाण्यात भिजत घालणे.
दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये मऊ शिजवून घेणे (नेहमीपेक्षा ५,७ मिनिटे जास्त ). हवा असेल तर शिजवताना चिमुटभर खायचा सोडा घालावा .
छोल्यात  चिंचेचे पाणी व मीठ घालून ठेवावे .
कांदा ,टोमाटो वेगवेगळे किसून ठेवणे.
आलं ,लसूण,मिरची वाटून ठेवणे.
कढईत तेल किंवा तूप घेणे , तेलाचा गरमपणा बघण्यासाठी फक्त २,४ दाणे मोहोरी टाकणे ,
तडतडल्यावर हिंग घालणे .मग तमालपत्र ,त्यानंतर हळद .कांदा,आलं-लसूण पेस्ट ,
त्यानंतर २,४ मिनिटांनी बारीक किसलेला टोमाटो ,
धनेजिऱ्याची पूड १ चमचा,तिखट १ चमचा ,मीठ घालणे .
तेल सुटायला लागल्यावर छोले घालणे .
छोल्यात सोड्याचे पाणी असेल तर ते काढून टाकून साधे पाणी घालावे.
त्यानंतर ५ मिनिटांनी थोडा गरम मसाला किंवा छोले मसाला घालावा .
आणखी ५ मिनिटांनी गॅस बंद करावा.

वरून कोथिंबीर घालून सजवावे.

सुक्या भाज्या – Vegetables

साहित्य

भाजी, तिखट ,मीठ, फोडणीचे साहित्य , आवडीप्रमाणे मिरची, कोथिंबीर.

कृति 

भाजीचे सारख्या आकाराचे काप किंवा तुकडे करावे.

गरम तेलात मोहोरी, हिंग, हळद या क्रमाने फोडणी करावी.

भेंडी, तोंडली ,दुधी भोपळा, लाल भोपळा, फ्लॉवर , कोबी , फरसबी  या भाज्या हव्यातर microwave मध्ये वाफवून घ्याव्यात.

(अर्ध्या किलो भाजीला साधारण ८, १० मिनिटे लागतात.  भोपळ्याला जरा कमी , तोंडल्याना जास्त वेळ लागेल . दर २,३ मिनिटांनी भाजी हलवून ठेवावी.)

कढईत भाजी घातल्यावर सुकी वाटल्यास ,पाणी शिंपडून , झाकण ठेवून शिजू द्यावी .

साखर(अर्धा, पाव चमचा ) , मीठ, तिखट घालावे. कोथिंबीर बारीक चिरून घालावी.

दुधी व फ्लॉवर च्या फोडणीत ( किंवा नंतर मिरचीबरोबर कुटून )  जिरे  चांगले लागते .

फ्लॉवर व कोबीत साली काढून बटाटे भाजीपुर्वी फोडणीत टाकले तर चांगले लागते.

फ्लॉवर, कोबी,दुधी यात मटारहि चांगले लागतात.

फरसबीमध्ये हरभऱ्याची डाळ २,३ तास भिजवून भाजीआधी फोडणीत घातल्यास चांगली लागते.( किंवा बटाटाही चालेल)

 

पावभाजी – Pavbhaji

साहित्य  –

फ्लॉवर ,बटाटे,टोमॅटो ,कांदे, सिमला मिरची, गाजर , फरसबी , आले ,लसूण , मिरची ,  मटार ,

पावभाजी मसाला ,तिखट ,मीठ , तेल किंवा लोणी , हळद ,हिंग .

कृति  

थोड्याशा तेलावर अर्धा चमचा हळद घालून फ्लॉवर परतून घ्यावा.(वास जाण्यासाठी)

वरीलप्रमाणे परतलेला किंवा नुसता फ्लॉवर  कुकरमध्ये अथवा microwave मध्ये शिजवून घ्यावा.

त्याच्या बरोबरच घालायचे असल्यास थोडे फरसबीचे तुकडे , गाजराचे तुकडे, भोंडी मिरची(सिमला मिरची)  उकडून घ्यावे.

बटाटे उकडून गार झाल्यावर सोलून ठेवावेत .

कढईत तेल किंवा लोणी गरम करावे त्यात हवे असल्यास हळद , हिंग घालावे.

कांदा, टोमॅटो बारीक चिरून परतून घ्यावे.

त्यावर आले ,लसूण , मिरची कुटून घालावे.

शिजवलेल्या भाज्या, कुस्करलेले बटाटे घालावे .

मीठ,तिखट,पावभाजी मसाला ,मटार थोडे पाणी घालून ढवळावे

कांदे बटाटे रस्सा – Kande Batate Rassa (Stew)

साहित्य

कांदे, बटाटे, टोमॅटो ,मटार , आले, लसूण  , मिरची ,कोथिंबीर

कृति 

प्रथम फोडणी करून त्यात कांदा परतून घेणे.

त्यावर  टोमॅटो व  आले लसूण मिरचीची   पेस्ट घालावी .

बटाटे साले काढून फोडी करून घालावे.

आवडीप्रमाणे पाणी घालावे.

धने जिरे पूड व हवे तर गरम मसाला घालावा.

बटाटे नीट शिजल्यावर मटार व कोथिंबीर घालावी .

यात फ्लॉवरहि  घालता येतो.

 

 

उसळ – Usal

साहित्य

कडधान्य , कांदा, आले,लसूण , मिरची , गूळ/साखर ,धनेजीरे पूड , गोडा मसाला .

कृति

मटकी, मूग यांना मोड  आणण्यासाठी १२ तास  भिजवून ठेवावे .

नंतर त्यातले पाणी काढून टाकून चाळणीत घालून किंवा फडक्यात  बांधून ठेवावे.

साधारण १२ तासांनी चांगले मोड आल्यावर उसळ करावी.

मसूर  व चवळी ऐनवेळी करता येतात.

चवळी प्रथम भाजून घ्यावी व त्यानंतर थोडी हळद व हिंग घालून कुकरमध्ये शिजवावी .

उसळ करताना कोणतेही  कडधान्य कुकरमध्ये शिजवून घ्यावे .

कांदा फोडणीत घालून परतून घ्यावा .

त्यावर आले लसूण  पेस्ट किंवा लसुणीचे बारीक तुकडे घालावे.

नंतर शिजलेले कडधान्य व त्यावर तिखट , मीठ ,  धनेजीरे पूड ,  गोडा मसाला  व आवडत असल्यास मिसळ मसाला  घालावा.

गूळ किंवा साखर आवडीप्रमाणे घालावे.

शेवटी कोथिंबीर घालावी.