बटाट्याचे परोठे – Batata Parothe

साहित्य

बटाटे, जिरे , मिरची, आले, (हवीतर लसूण ), तिखट, मीठ, कोथिंबीर , गव्हाचे पीठ .

कृति 

बटाटे कुकरमध्ये उकडून घ्यावे.

गार झाल्यावर सोलून कुस्करावे.

त्यात जिरे,मिरची,आले (हवीतर लसूणही)  व मीठ  कुटून  घालावे.

गरज वाटल्यास तिखट घालावे.

कोथिंबीर बारीक चिरून घालावी.

गव्हाच्या पिठाची कणिक भिजवताना त्यातही थोडे तिखट , मीठ घालावे.

कणकेत बटाट्याचे सारण भरून परोठे लाटावेत.

 

Leave a comment