साहित्य –
तूर/मूग/मसूर एकत्र किंवा एका वेळी एखादी डाळ , चिंच , गूळ , गोडा मसाला ,
तिखट,मीठ , कढीलिंब , मिरची , ओले खोबरे , कोथिंबीर
कृति
कुकरमध्ये वरण शिजवून घ्यावे.
तुरीच्या ऐवजी आपण मुग,मसूर डाळीही वापरू शकतो.
चिंच भिजवून ठेवावी. व करण्याआधी कोळून (पाण्यात नीट विरघळवून) पाणी गाळून घ्यावे.
शिजलेल्या वरणात चिंचेचे पाणी , गूळ , गोडा मसाला , तिखट , मीठ घालावे.
नेहमीप्रमाणे फोडणी करून त्यावर कढीलिंब, मिरची व वरील तयार केलेले वरण घालावे.
उकळताना ओले खोबरे (असल्यास ) व कोथिंबीर घालावी.