साहित्य –
भाजी, तिखट ,मीठ, फोडणीचे साहित्य , आवडीप्रमाणे मिरची, कोथिंबीर.
कृति
भाजीचे सारख्या आकाराचे काप किंवा तुकडे करावे.
गरम तेलात मोहोरी, हिंग, हळद या क्रमाने फोडणी करावी.
भेंडी, तोंडली ,दुधी भोपळा, लाल भोपळा, फ्लॉवर , कोबी , फरसबी या भाज्या हव्यातर microwave मध्ये वाफवून घ्याव्यात.
(अर्ध्या किलो भाजीला साधारण ८, १० मिनिटे लागतात. भोपळ्याला जरा कमी , तोंडल्याना जास्त वेळ लागेल . दर २,३ मिनिटांनी भाजी हलवून ठेवावी.)
कढईत भाजी घातल्यावर सुकी वाटल्यास ,पाणी शिंपडून , झाकण ठेवून शिजू द्यावी .
साखर(अर्धा, पाव चमचा ) , मीठ, तिखट घालावे. कोथिंबीर बारीक चिरून घालावी.
दुधी व फ्लॉवर च्या फोडणीत ( किंवा नंतर मिरचीबरोबर कुटून ) जिरे चांगले लागते .
फ्लॉवर व कोबीत साली काढून बटाटे भाजीपुर्वी फोडणीत टाकले तर चांगले लागते.
फ्लॉवर, कोबी,दुधी यात मटारहि चांगले लागतात.
फरसबीमध्ये हरभऱ्याची डाळ २,३ तास भिजवून भाजीआधी फोडणीत घातल्यास चांगली लागते.( किंवा बटाटाही चालेल)