बटाटेवडे – Batata wada

साहित्य  –

बटाटे , आले , लसूण, मिरची ,तिखट ,मीठ,लिंबू, कोथिंबीर ,

डाळीचे पीठ , तेल , हळद.

कृति  

बटाटे उकडून घ्यावे .

आलं , लसूण ,मिरची अगदी बारीक चिरून, कुटून घ्यावे, मीठ,तिखट, साखर (अगदी चिमुटभर ) , हवेतर  लिंबू, कोथिंबीर  घालावे .

वरून फोडणी घालावी किवा कढईत भाजी करून घ्यावी.

सारख्या आकाराचे गोळे करून ठेवावेत.

वरच्या आवरणासाठी डाळीचे पीठ , तिखट, मीठ , हळद घालून  भिजवावे.

त्यात  थोडे गरम तेल (१,२ चमचे ) व चिमुटभर सोडा घालावा .

तेल कढईत  तापवावे .

बटाट्याचे गोळे डाळीच्या पिठाच्या मिश्रणात बुडवून , तेलात तळून काढावे .

 

Leave a comment