उकड (Ukad)

साहित्य –

तांदुळाचे पीठ ,ताक , पाणी ,तीळ , कढीलिंब ,मिरची, कोथिंबीर ,मीठ

कृती –

तांदुळाच्या पिठात पाणी,ताक ,मीठ ,तीळ  घालून अगदी पातळ भिजवणे ( पाण्याइतके पातळ ) .

तेल तापल्यावर त्यावर मोहरी, हिंग,कढीलिंब ,मिरची घालणे .

त्यावर कालवलेले तांदुळाचे पीठ ओतणे.

झाकण घालून शिजू देणे .

अधूनमधून ढवळणे , कोथिंबीर चिरून घालणे .

 

शेवयांचा उपमा (Sevai Upma )

साहित्य

बारीक शेवया ३ वाटया ,पाणी २ वाटया , कांदा, दाणे , उडीद डाळ ,लाल किंवा हिरवी मिरची ,

कढीलिंब, कोथिंबीर ,मीठ ,तेल 

कृती

बारीक शेवया तुकडे करून microwave मध्ये परतून घ्याव्या .

गरम तेलात मोहरी,हिंग ,कढीलिंब ,उडीद डाळ , मिरची , भाजून सोललेले दाणे घालावे .

त्यावर कांदा परतून घ्यावा .

नंतर २ वाटया पाणी ,मीठ व चिमुटभर साखर घालणे .

उकळी आल्यावर शेवया घालणे ,१,२ मिनिटांनी बाद करणे .

 

चुरचुरीत पोहे – Crispy Pohe

साहित्य

पातळ पोहे , कांदा , मिरची, कोथिंबीर, तिखट, मीठ, लिंबू , शेव /पापड

कृति 

पातळ पोहे microwave मध्ये २,३  मिनिटे भाजून घ्यावे (दर अर्ध्या,एक मिनिटाने हलवावे )

छोट्या कढईत फोडणी करून जरा गार झाल्यावर पोह्यांवर घालावी .

त्यावर चिरलेला कांदा , मिरची, कोथिंबीर , तिखट,मीठ, चिमुटभर साखर , लिंबूरस  घालून नीट कालवावे..

वरून शेव , तळलेला किंवा भाजलेला  पापड घालावे.

दडपे पोहे – Dadpe pohe

 

साहित्य  –

पातळ पोहे , ताक, मीठ , साखर , कांदा , मिरची, कोथिंबीर ,नारळ (आवडत असल्यास थोडे मेतकुट )

कृति 

 

सर्व एकत्र करून वरून फोडणी घालून , व्यवस्थित कालवावे. नंतर दडपून ठेवावे .(ताटलीखाली दाबून)

ताकाऐवजी टोमॅटो किंवा लिंबू वापरता येईल.

खाताना वरून शेव, भाजलेला किंवा तळलेला पोह्याचा पापड , मिरगुंड  असे काहीतरी घालून घ्यावे.

पोहे – Pohe

IMG-20170806-WA0019साहित्य –

पोहे , कांदा , बटाटा ,कढीलिंब , मिरच्या,कोथिंबीर, लिंबू, मटार .

कृति 

पातळ पोहे असल्यास ऐनवेळी (पण फोडणी देण्याआधी) पाणी शिंपडावे , जाड पोहे असल्यास आधी धुऊन मग इतर तयारी करावी.

कांदे , बटाटे चिरून घ्यावे

तेल गरम केल्यावर मोहरी,  ती तडतडल्यावर हिंग नंतर हळद , मिरच्या, कढीलिंब , कांदा , बटाटे या क्रमाने घालावे.

पुरेसे परतून झाल्यावर तिखट, मीठ व साखर घालणे ,

शेवटी ओले पोहे घालून ढवळावे . ५,७ मिनिटे तरी झाकण घालून अधून मधून परतत राहावे. कोथिंबीर धुऊन बारीक चिरून घालावी.

ओले खोबरे असेल तर वरून घालावे .