साहित्य – १ वाटी तूप , २ वाटया बेसन ( चणा डाळीचे पीठ ) , पाव वाटी रवा ,
दीड वाटी पिठीसाखर , जायफळ व वेलदोडा पूड , पाव वाटी दुध
कृती – प्रथम तूप गरम करून , नंतर त्यात बेसन भाजावे .
अर्धवट भाजून झाल्यावर त्यात मुठभर रवा घालावा .
खमंग ,तांबूस झाल्यावर भाजणे थांबवावे .
थोडे दुध शिंपडून जोरात हलवावे (वाफ होऊन गेली पाहिजे )
गार झाल्यावर पिठीसाखर ,जायफळ व वेलदोडा पूड घालून नीट मिसळावे व लाडू वळावे .